भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपणची कर्ता आपणची मित्र । आपण सर्वत्र हरी झाला

apanachi karta apanachi mitra | apan sarvatra hari jhala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आपणची कर्ता आपणची मित्र । आपण सर्वत्र हरी झाला ॥१॥ साधन साधितां हरि दिसे पूर्ण । प्रपंच हें भान न देखें डोळां ॥२॥ किमर्थ हें टवाळ मायामोह जाळ । वांयांच पा-ल्हाळ कोरडे करा ॥३॥ नामा ह्मणे सखोल विठ्ठल पूर्ण बोल । उच्चारितां मोल नलगे कांहीं ॥४॥