भजनी मालिका

संत जनाबाई

या संतांची भजने

विठोबा मला मूळ धाडा । धांवत येईन दुडदुडां चरणीं लोळेन गडबडा । माझा जीव झाला वेडा || १|| कर ठेवुनि कटावरी उभा राहिला विटेवरी। मुगुट घातला सरीं। कलगी खोविली वरी॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

विठोबारायाच्याअगालेकवळाजाऊनीकळवळासांगामाझा॥१॥ विठोबारायाच्या अंगा मुख्य प्राणा भेटवी निधाना आपुलिया ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

वियोग नाम्याचा न साहे गोपाळा । न जाय राउळा पांडुरंग ॥१॥ पद्माळ्यांत तेव्हां राहे विश्वंभर । कले समाचार रुक्मिणीसी।।२।।

रचनाकार: संत जनाबाई

विश्वामित्र द्विजचिन्ह । स्वप्नीं प्रगटे आपण ।।१।। देखोनियां द्विजवरातें नमियेलें जोडुनी हातें ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

विश्वामित्रें जाऊनि पुढें। वणवा लाविला चहूंकडे ।।१।। धूम्र दाटलें अंबर। ज्वाळा येती भयंकर ।।२।।

रचनाकार: संत जनाबाई

वैराग्य अभिमानें फिरविलें जातें म्हणवोनि यातें भाव खुंटा ।।१।। संचित मातृका वैरण घातली। अव्यक्ति दळिलीं व्यक्ताव्यक्त॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

वैष्णव तो एक इतर तीं सोंगें। उसे देउनी अंगें चितारिती ॥१॥ जिचे योनि जन्मला तिसी दंडूं लागला । तीर्थरूप केला देशधडी ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

वैष्णव तो कबीर चोखामेळा महार। तिजा तो चांभार रोहिदास ||१|| सजण कसाई बाया तो कसाब। वैष्णव तो शुद्ध एकनिष्ठ ||२||

रचनाकार: संत जनाबाई

शब्दाचें ब्रह्म लौकिकी हो दिसे । जैसे ते फांसे मइंदांचे ॥१॥ ज्ञानी तो कोण विज्ञानी तो कोण । दोहींचा आपण साक्षभूत ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई