भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेष धरोनी ब्राह्मण तिसी करी संभाषण

vesh dharoni brahman tisi kari sambhashan

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
वेष धरोनी ब्राह्मण तिसी करी संभाषण ।।१।। खेद न करी मानसीं काय करणें होणारासी ॥२॥ वेगीं संस्कारी याला दिवसा मागतीं जा कामाला ||३|| घेऊनियां प्रेतासी । वेगीं चेतवी अनीसी ॥४॥ ज्वाळा अवलोकितां नयनीं । राव आला तत्क्षणीं ॥५॥ म्हणे कोण गे तूं येथें । येरी म्हणे तुमचा सुत ॥६॥ कैंचा सुत कैसा काय आमचा हक कोठें आहे ।।७।। करुणा म्लानी करी त्याची म्हणे गोष्ट हे तों कैंची।।८।। बरॅपणें जाई आतां। दंड बैसतील माथां ।।९।। घेई प्रेत ओसंगळी । वेगें प्रवेशे देउळीं ।।१०।। आवडें प्रेत झोपी जाय। ऋषि धांवे लवलाहे ।।११।। उदर चिरोनियां नखीं । मांस कवळें घालीं मुखीं ।।१२।। येऊनियां नगरनारी । जनी म्हणे शंख करी ॥१३॥