भजनी मालिका
← भजनांकडे परत

विश्वामित्रें जाऊनि पुढें। वणवा लाविला चहूंकडे

vishvamitren jauni pudhen| vanava lavila chahunkade

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
विश्वामित्रें जाऊनि पुढें। वणवा लाविला चहूंकडे ।।१।। धूम्र दाटलें अंबर। ज्वाळा येती भयंकर ।।२।। विश्वामित्रे काय केलें । राया बाळातें चुकविलें ॥३॥ दोघे न पडती दृष्टी होवोनियां परम कष्टी ||४|| म्हणे अहा कटकटा काय लिहिलें अदृष्टश ||५|| मेले वणव्यांत जळोनी ऐसें आलें तिचे मनीं ॥६॥ पिटीलल्लाट करतळें। अंग टाकी धरणीं लोळे।।७।। म्हणे बाळा रोहिदासा । भेट देई गा पाडसा ||८|| सूर्यवंशी चुडारत्ना । प्राणपति गा निधाना।।९।। राव दृष्टि न पडतां अग्नि खाईन तत्त्वतां ।।१०।। ऐसें विचारिलें मनीं । म्हणे नामयाची जनी ।। ११ ।।