भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैराग्य अभिमानें फिरविलें जातें म्हणवोनि यातें भाव खुंटा

vairagya abhimanen phiravilen jaten mhanavoni yaten bhav khunta

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
वैराग्य अभिमानें फिरविलें जातें म्हणवोनि यातें भाव खुंटा ।।१।। संचित मातृका वैरण घातली। अव्यक्ति दळिलीं व्यक्ताव्यक्त॥२॥ नामरूपा आदि दळियेलें सर्व पीठ भरी देव पंढरीचा ||३|| नवल हा देव चैसला दळणीं नाहीं केली जनी नामयाची ॥४॥