भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

चिंतनें बिभीषण मुक्त । चिंतनें जाहला जनक जीवमुक्त । चिंतनें कुळ सरित । सर्वेभावें हरि होय ॥१॥ आवडी चिंतावे चरण । दुजेंनको मानधन । नाम स्मरणावांचुन । चिंतनचि नसो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चिंतनेंक नासतसे चिंता । चिंतनें सर्व कार्य ये हातां । चिंतनें मोक्ष सायुज्यता । घर शोधितसे ॥१॥ ऐसे चिंतनाचें महिमान । तारिले अधम खळ जन । चिंतने समाधान । प्राणिमात्रा होतसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चिंतातुर मन नसावें कदाकाळीं । हृदयीं नामावळी जप करी ॥१॥ श्रीअनंता माधवा गोविंदा । हाचि जप सदा चिंत्तामाजीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चित्त चैतन्य पडली गांठी न सुटे मिठी । संचित कर्माचि झाली आटी उरफाटी दृष्टी ॥१॥ कैंचा आठव दृश्याचा । खुंटली वाचा उदय झाला सुखाचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चित्त वेधियलें नदांच्या नंदनें । मोहियलें ध्यानें योगीराज ॥१॥ सगुण सुंदर पाहतां मनोहर । सबाह्म अभ्यंतर व्यापियेलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चित्रगुप्त म्हणती करावें काई । यमदूताविण न चले कांहीं ॥१॥ नामें नागविलें नामें नागविलें । यम म्हणे माझे सामर्थ्य न चले ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चैतन्याचा साक्षी सर्वांसी परीक्षी । अलक्षाच्या लक्षी न ये ध्याना ॥१॥ बहुत भागले बहुत श्रमले । परी नाहीं लाभलें रुप ज्यांचें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चोखामेळियाची ऐकोनी करुणा । चालिले भोजना देवराव ॥१॥ नामदेवासहित अवघे गणगंधर्व । इंद्रादिक देव चालियले ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चोख्याचे अंगणीं बैसल्या पंगती । स्त्री ते वाढिती चोखियाची ॥१॥ अमृताचें ताट इंद्रें पुढें केलें । शुध्द पाहिजे केलें नारायणा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चोरासी खंडन करावें हाचि धर्म । आणीक नाहीं वर्म दुजें कांहीं ॥१॥ माझ्या विठोबाची आज्ञा पैं मोडिली । शपथ पाळिलीं नाहीं दुष्टे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चोर्‍यांयशी लक्ष देहाप्रती । कोटी कोटी फेरे होती ॥१॥ अवचट देह मनुष्य जन्म । तेथें साधावें परब्रह्मा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चौर्‍यांयशीं भोगितां । दुःख न सरे सर्वथा । संतसमागम घडतां । दुःख नासे तात्काळ ॥१॥ नको गुतूं या संसारीं । पडसी काळाचे आहारीं । संतसमागम धरी । तैं यातना चुकती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चौर्‍यांयशी लक्ष योनी फिरतां । अवचट नरदेह आला होतां ॥१॥ करीं याचें समाधान । वाचे गाई नारायण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चौर्‍यायंशी लक्ष योनी फिरे । परि मनीं सोय न धरे ॥१॥ दोचि अक्षरांचें काम । अधम नुच्चारी रामनाम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

छत्तिसांतील चेतना । तोचि पुरुष जाणा । हेंचि निवडुनी अर्जुना । सांगितलें ॥१॥ तेची दैवी प्रकृति माया । तेचि बोध आणि तुर्या । ऐसें धनंजया । सांगितलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

छळणे करुनी बोलतां । तात्काळ जाली समाधी अवस्था । सद्भावें विनटतां संतां । न कळे तत्त्वता काय देती ॥१॥ जाणा जाणते सकळ । ज्यासी निजप्राप्तीची कळवळ । तिहीं सांडोनि स्थळ । संतजन वंदावे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ