भजनी मालिका
← भजनांकडे परत

चोखियाची भक्ति कैसी । प्रेमें आवड देवासी

chokhiyachi bhakti kaisi | premen avad devasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चोखियाची भक्ति कैसी । प्रेमें आवड देवासी ॥१॥ ढोरें वोढी त्याचे घरीं । नीच काम सर्व करी ॥२॥ त्याचे स्त्रीचें बाळंतपण । स्वयें करी जनार्दन ॥३॥ ऐसी आवड भक्तासी देखा । देव भुलले तया सुखा ॥४॥ नीच याती न मनीं कांहीं । एका जनार्दनीं भुलला पाही ॥५॥