भजनी मालिका
← भजनांकडे परत

चित्त समाधान । सुख दुःख सम जाणे

chitta samadhan | sukh duhkh sam jane

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चित्त समाधान । सुख दुःख सम जाणे ॥१॥ न करी आणीक उपाधी । निवारली आधि व्याधी ॥२॥ वृत्ति झाली समरस । सेवीं नित्य ब्रह्मारस ॥३॥ एका जनार्दनीं चित्त । ब्रह्मारसें झालें शांत ॥४॥