भजनी मालिका
← भजनांकडे परत

चैतन्याचा साक्षी सर्वांसी परीक्षी । अलक्षाच्या लक्षी न ये ध्याना

chaitanyacha sakshi sarvansi parikshi | alakshachya lakshi na ye dhyana

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चैतन्याचा साक्षी सर्वांसी परीक्षी । अलक्षाच्या लक्षी न ये ध्याना ॥१॥ बहुत भागले बहुत श्रमले । परी नाहीं लाभलें रुप ज्यांचें ॥२॥ भक्तांचेनि भावें पंढरीये उभा । आनंदाचा गाभा सांवळा तो ॥३॥ एका जनार्दनीं तो सर्वव्यापक उभा असे नायक वैकुंठीचा ॥४॥