भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

चला बाई वृंदावनीं रासक्रीडाम पाहुं । नंदाचा बाळ येणें केला नवलाऊ ॥१॥ कल्पनेची सासु इचा बहुताचि जाचु । देहभाव ठेऊनी पायां ब्रह्मापदीं नाचुं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चहुं वाचांपरता चहुं वेदां निरुता । न कळे तत्त्वतां चतुर्वक्त्रा ॥१॥ चौबारा खेळतु सौगंडी सांगातु । लोणी चोरुं जातु घरोघरीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चातकाची तहान किती । तृप्ति करूनि निववी क्षिती ॥१॥ धेनु वत्सातें वोरसे । घरीं दुभतें पुरवी जैसें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चांदाळादि ब्राह्मण सर्व नारिनर । सर्वांसी आधार नाम सत्य ॥१॥ नामाविण गति नसेचि आणिक । वैकुंठनायक सुलभ देखा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चार देह चार अवस्था समाधी । कासया उपाधि करिसी बापा ॥१॥ चार वेद जाण युगें प्रमाण । पांचवें विवरण न करी बापा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चार मुद्रा आणि समाधी त्या चारी । दिसती चक्राकारी स्वरुप हें ॥१॥ चहूं समाधीचें पाहीं हें देखणें । विकळतां तेणेंक सहजीं व्हावी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चालतां मारगीं फुटतसे वाट । मागतो वो भाट सहजीं होय ॥१॥ तैसें नोहे संतमार्गाचें लक्षण । चालत मागुन आले सर्व ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चालतानां वाटें अपूर्व देखिलें । मनीं हें वहिलें द्वारका दिसे ॥१॥ श्रमलासे मनीं न सुचे विचार । म्हणे द्वारके सत्वर कैसा आलों ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चिंतन तें सोपें जगीं । रामकृष्ण म्हणा सत्संगी । उणें पडॊं नेदी व्यंगीं । देव धांवे चिंतनें ॥१॥ चिंतन करितां द्रौपदीं । पावलासें भलते संधीं । ऋषिश्वरांची मांदी । तृप्त केली क्षणमात्रें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चिंतन तें हरिचरण । हेंचि कालीमाजींप्रमाण । सर्व पुण्याचें फल जाण । नामस्मरण विठ्ठल ॥१॥ मागें तरले पुढे तरती । याची पुराणीं प्रचिती । वेद शास्त्र जया गाती । श्रुतीहि आनंदें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चिंतनासी न लगे वेळ । कांही न लगे तया मोल । वाचे वदा सर्वकाळ । राम हरी गोविंद ॥१॥ हाचि पुरे मंत्र सोपा । तेणें चुके जन्म खेपा । आणिक तें पापा । कधी नुरें कल्पातीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चिंतनी केला उद्धार । चिंतनें तरले नारीनर । पशुपक्ष्यादि साचार । चिंतनेची तारिले ॥१॥ एवढी चिंतनाची थोरी । महा पापा होय बोहरी । यातीकुळाची वारी । कोण पुसे थोरीया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चिंतनें उद्धरला पापी । महा दोषी केला निःपापी । तया म्हणती ऋषी तपी । पुराणीं तें सर्व ॥१॥ नारदें सांडोनिया मंत्र । केला जगी तो पवित्र । चिंतना एवढें पात्र । आन नाही सर्वथा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चिंतने कंसासुर तरला । चिंतनें पूतनेचा उद्धार केला । चिंतने आनंद जाहला । अर्जुनादिकांसी ॥१॥ म्हणोनी करावें चिंतन । काया वाचा आणि मन । संतांचे चरण । नित्य काळ चिंतावें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चिंतनें गणिका निजपदा । चिंतने अजामेळ तोहि सदा । बैसविला आपुले पदा । चिंतनेची सर्वथा ॥१॥ चिंतनें उद्धरी सर्वथा । न म्हणे यातिकुळ कुपात्रा । चिंतनें तारी सर्वत्रा । प्राणिमात्रा जगासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चिंतनें धांवे भक्तांपाठीं । धरीं कांबळीं हातीं काठी । चिंतनें उठाउठी । बांधवितो आपणिया ॥१॥ ऐसा भुकेला चिंतनाचा । न पाहे यातीहीन उंचाचा । काय अधिकार शबरीचा । फळें काय प्रिय तीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चिंतनें पर्वकाळ रासी । येती अपैशा घरासी । चिंतन तें सार सर्वांसी । व्रतां तपांसी चिंतन ॥१॥ चिंतनें यज्ञ दान धर्म । चिंतनें घडे नाना नेम । आणिक तें वर्म । चिंतने घडे सर्वथा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चिंतनें बळिद्वारें बंधन । चिंतनें ह्य समाधान । न म्हणे उच्छिष्ट अथवा पुर्ण । चिंतनेंची मुख पसरी ॥१॥ चिंतनें भोळे भाविक जन । तयाचें वारी नाना विघ्न । धर्माघरीं उच्छिष्ट जाण । चिंतनसाठी काढितसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ