भजनी मालिका
← भजनांकडे परत

चिंतने कंसासुर तरला । चिंतनें पूतनेचा उद्धार केला । चिंतने आनंद जाहला । अर्जुनादिकांसी

chintane kansasur tarala | chintanen putanecha uddhar kela | chintane anand jahala | arjunadikansi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चिंतने कंसासुर तरला । चिंतनें पूतनेचा उद्धार केला । चिंतने आनंद जाहला । अर्जुनादिकांसी ॥१॥ म्हणोनी करावें चिंतन । काया वाचा आणि मन । संतांचे चरण । नित्य काळ चिंतावें ॥२॥ चिंतन आअनीं शयनीं । भोजनीं आणि गमनागमनीं । सर्वकाळ निजध्यानीं । चिंतन रामकृष्णाचें ॥३॥ चिंतन हेंची तप थोरा । चिंतनें साधे सर्व संसार । एका जनार्दनीं निर्धार । नामस्मरण चिंतन ॥४॥