भजनी मालिका
← भजनांकडे परत

चांदाळादि ब्राह्मण सर्व नारिनर । सर्वांसी आधार नाम सत्य

chandaladi brahman sarva narinar | sarvansi adhar nam satya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चांदाळादि ब्राह्मण सर्व नारिनर । सर्वांसी आधार नाम सत्य ॥१॥ नामाविण गति नसेचि आणिक । वैकुंठनायक सुलभ देखा ॥२॥ नाम विठोबांचे घ्यावें निशिदिनीं । चौर्‍यांशंची खाणी तेव्हा चुकें ॥३॥ एका जनार्दनीं पूर्णता एकपणीं । नाम घ्या निशिदिनीं सर्वकाळ ॥४॥