भजनी मालिका
← भजनांकडे परत

चिंतनी केला उद्धार । चिंतनें तरले नारीनर । पशुपक्ष्यादि साचार । चिंतनेची तारिले

chintani kela uddhar | chintanen tarale narinar | pashupakshyadi sachar | chintanechi tarile

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चिंतनी केला उद्धार । चिंतनें तरले नारीनर । पशुपक्ष्यादि साचार । चिंतनेची तारिले ॥१॥ एवढी चिंतनाची थोरी । महा पापा होय बोहरी । यातीकुळाची वारी । कोण पुसे थोरीया ॥२॥ भुक्तिमुक्तीचें सांकडें । तया न पडेचि बापुडें । चिंतनेंची कोंडें । सर्व हरे तयांचे ॥३॥ एका जनार्दनीं मन । दृढ ठेवावें बांधून । चिंतनेंचि जाण । सर्व लाभ घडती ॥४॥