भजनी मालिका
← भजनांकडे परत

चिंतनें धांवे भक्तांपाठीं । धरीं कांबळीं हातीं काठी । चिंतनें उठाउठी । बांधवितो आपणिया

chintanen dhanve bhaktampathin | dharin kambalin hatin kathi | chintanen uthauthi | bandhavito apaniya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चिंतनें धांवे भक्तांपाठीं । धरीं कांबळीं हातीं काठी । चिंतनें उठाउठी । बांधवितो आपणिया ॥१॥ ऐसा भुकेला चिंतनाचा । न पाहे यातीहीन उंचाचा । काय अधिकार शबरीचा । फळें काय प्रिय तीं ॥२॥ एका जनार्दनीं चिंतन । तेणें जोडे नारायण । आणिक न लगे साधन । कलीमाजीं सर्वथा ॥३॥