भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

आश्वासिलें भक्ता दिलें सर्व सुख । बैसविले लोक विमानांत ॥१॥ नारी नर पशू जीवजंतु भुते । विमानीं समस्तें बैसविलीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आषाढी पर्वकाळ । निघताती संतमेळ । करिती गदारोळ । विठ्ठलकीर्तनीं ॥१॥ धन्य धन्य त्यांचें कुळ । पावन ते सकळ । येवोनि उतावीळ । विठ्ठल भेटती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आषाढी पर्वकाळ एकादशी दिन । हरिजाग्रण देवा प्रिय ॥१॥ निराहारे जो व्रत करी आवडी । मोक्ष परवडी त्याचे घरीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आषाढीची यात्रा आला पर्वकाळ । निघाला संतमेळ पंढरीसी ॥१॥ निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताई । आणिकही अनुभवी संत बहु ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आष्टांग साधन मौनी जटाधारी । एक चरणावरी करती तप ॥१॥ वायु ते आहार असती दिंगबर । परि न कळे विचार देव कोठें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आहर्निशी योगी साधिती साधन । तयासी महिमान न कळेची ॥१॥ तो हा श्रीहरी बाळवेषें गोकुळीं । खेळे वनमाळी गोवाळीयांसीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आहारालागीं करी देवाचें भजन । मिळे मिष्ठान्न भोजनासी ॥१॥ आहारालागीं करी तीर्थांचे भ्रमण । आहारें जिंकिलें मन सर्वपरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आहारे निर्देवा काय करसी तप । वाउगाची जप शांतीविण ॥१॥ आहारे पाररा नेणसी देवासी । वाउगा शिणसी काय काजा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

इकडुनी तिकडे चालू जैसें माप । तैशी जन्ममरण खेप प्राणियांसी ॥१॥ भोगितां नूतन सांडिती ते जाण । तैसें जन्ममरण प्राणियांसी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

इकडे रुक्माईसी सांगे करुणाकर । चला पैं सत्वर पंढरीये ॥१॥ गरुडासहित वेगें पैं निघाले । पूर्ववत आले पंढरीये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

इच्छिताती देव पंढरीचा वास । न मिळे सौरस तयां कांहीं ॥१॥ ऐसें श्रेष्ठ क्षेत्र उत्तमा उत्तम । याहुनी सुगम आहे कोठें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

इंद्राचे कैवारें कांसव पै झाला । देव घुसळिती पृष्ठीं भार वाहिला ॥१॥ तो पहा महाराज विटे उभा नीट । भक्त तारावया केली पंढरी पेठ ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

इंद्रिया देवाची सुटली बांदवडी । स्वानंदें उभाविली गुढी सरली असुर धाडी ॥१॥ रामराज्य झालें रामराज्य झालें । रामराज्य झालें सदगुरुचेनि बोले ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ