भजनी मालिका
← भजनांकडे परत

इंद्राचे कैवारें कांसव पै झाला । देव घुसळिती पृष्ठीं भार वाहिला

indrache kaivaren kansav pai jhala | dev ghusaliti prushthin bhar vahila

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
इंद्राचे कैवारें कांसव पै झाला । देव घुसळिती पृष्ठीं भार वाहिला ॥१॥ तो पहा महाराज विटे उभा नीट । भक्त तारावया केली पंढरी पेठ ॥२॥ एका जनार्दनी रत्नं चौदा काढिलीं । देव सुरवर जेणें सुखीं केलीं ॥३॥