भजनी मालिका
← भजनांकडे परत

आहारालागीं देवपूजा । आहारें खादलेंसी निजा

aharalagin devapuja | aharen khadalensi nija

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आहारालागीं देवपूजा । आहारें खादलेंसी निजा ॥१॥ न कळेची हिताहित । आहारें खादलीं पंचभूतें ॥२॥ आहारालागीं कर्म धर्म । भुलला वर्म आहारेंची ॥३॥ आहारालागीं मंत्र तंत्र । आहारलागीं करी अपवित्र ॥४॥ आहारालागीं जाला भांड । एका जनार्दनीं काळें तोंड ॥५॥