भजनी मालिका
← भजनांकडे परत

इच्छा केली तें पावलों । देखतांचि धन्य जाहलों

ichchha keli ten pavalon | dekhatanchi dhanya jahalon

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
इच्छा केली तें पावलों । देखतांचि धन्य जाहलों ॥१॥ होते सुकृत पदरीं । तुमचें चरण देखिलें हरी ॥२॥ गेले भय आणी चिंता । कृतकृत्य जाहलों आतां ॥३॥ आजी पुरला नवस । एका जनार्दनीं जाहलों दास ॥४॥