भजनी मालिका
← भजनांकडे परत

आष्टांग साधन मौनी जटाधारी । एक चरणावरी करती तप

ashtang sadhan mauni jatadhari | ek charanavari karati tap

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आष्टांग साधन मौनी जटाधारी । एक चरणावरी करती तप ॥१॥ वायु ते आहार असती दिंगबर । परि न कळे विचार देव कोठें ॥२॥ कैशी तया भ्रांती असोनी देव जवळा । रिगती साधन कळा हुडाकिती ॥३॥ एका जनार्दनीं तया नाहीं सुख । संतांवांचुनी देख मार्ग न लागें ॥४॥