भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

आवडीच्या सुखा सुखावला । वैकुंठ सांडोनी पंढरीये आला ॥१॥ देखोनियां पुंडलीका । उभा सम पाई देखा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आवडीनें नाम वदा कीं रें राम । नासे भवभ्रम क्षणमात्रें ॥१॥ सोपें हें साधन कलयुगा माझारी । नामें पैठा हरी धरें होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आवडीनें भावें हरिनाम गावें । सप्रेम नाचावें कीर्तनरंगीं ॥१॥ तरती तरती तरती संसार । आणिक विचार दुजा नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आवडीनें भावें हरिनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥१॥ नको खेद धरुं कोणत्या गोष्टीचा । पति तो लक्ष्मीचा जाणतसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन ॥१॥ तुळसीमाळ गळा गोपीचंदन टिळा । हृदयीं कळवळा वैष्णवांचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आवरीं आवरीं आपुला हरी ।दुर्बळ्यांची केली चोरी । घरा जावयाची उरी । कृष्णें ठेविली नाहीं ॥१॥ गौळणी उतावेळी । आली यशोदेजवळी ।अवरीं आपुला वनमाळी । प्रळय आम्हां दिधला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आवाडीने माता बोले बाळकासी । तंव तो म्हणे विवसा पाठी लागे ॥१॥ सांगे लोकांपाशीं ब्रह्मज्ञान । झाला स्त्रीं आधीन स्वदेंहें तो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आशा टाकुनी फकीर जाला । परी भिक्षा मागणें जन्म गेला ॥१॥ तैशी नोहे परमार्थ रहाटी । शुद्ध मन करीजे पोटीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आशा धरुनि आलों येथवरी । पाहतां पंढरी पाव्न झालों ॥१॥ आलिया जन्माचें सुफळ झालें काज । दृष्टी गरुडध्वज पाहतांचि ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आशा पाश देवा नको या संसारी । नका चौर्‍यायंशीं फेरी वेरझार ॥१॥ सोडवी देवा कुंसगा टाकुन । मन तें उन्मन तुझे चरणीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आशा मनीषाचा विरह लागला । तेणें सांवळा दुरी ठेला । जवळी असोनी बोलती अबला । कवणें गुणें कान्हु रुसला ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

आशापाश सोडोनि देई । संतासीं तूं शरण जाईं । चौर्‍याशींचें भय नाहीं । प्राणिया तुज ॥१॥ आवडी धरीं संतसंग । कामक्रोधा होय भंग । षडवैरीयां मार्ग । मोकळाची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आशाबद्ध करिती देवाचें पूजन । तेणें नारायण तुष्ट नोहे ॥१॥ आशाबद्ध करिती वेदाचें पठन । तेणें नारायण तुष्ट नोहे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आशामनीषातृष्णा बांधिती दावणीं । सोडवी चक्रपाणीं संतसंगें ॥१॥ कामक्रोधालोभ याचा पसर । पाडिती विसर तुझा देवा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आशेपाशी काम आशेपाशीं क्रोध । आशेपाशी भेद लागलासे ॥१॥ आशेपाशीं कर्म । आशेपाशीं धर्म । आशेपाशीं नेम नानात्वाचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ