भजनी मालिका
← भजनांकडे परत

आशा टाकुनी फकीर जाला । परी भिक्षा मागणें जन्म गेला

asha takuni phakir jala | pari bhiksha maganen janma gela

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आशा टाकुनी फकीर जाला । परी भिक्षा मागणें जन्म गेला ॥१॥ तैशी नोहे परमार्थ रहाटी । शुद्ध मन करीजे पोटीं ॥२॥ सर्वांभुतीं नांदे एक देव । वाउगा कां वाढवा अहंभाव ॥३॥ जे जे वाणी स्तुति केली । ती ती देवासी पावली ॥४॥ ऐसा धरी दृढभाव । एका जनार्दनीं मागें ठाव ॥५॥