भजनी मालिका
← भजनांकडे परत

आशा मनीषाचा विरह लागला । तेणें सांवळा दुरी ठेला

asha manishacha virah lagala | tenen sanvala duri thela

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आशा मनीषाचा विरह लागला । तेणें सांवळा दुरी ठेला । जवळी असोनी बोलती अबला । कवणें गुणें कान्हु रुसला ॥१॥ धांवे धावे कान्हई नंदनंदना । पुरवीं तूं आमुची वासना । आणिक नको दुजी कल्पना । विरह निवारी देई दर्शना ॥२॥ छंदे छंदें विरहिणी बोलें । कां वो बोलण्या अबोलणें जालें । एका जनर्दनी ऐसें केलें । नंदनंदना चित्त गुंतलें ॥३॥