भजनी मालिका
← भजनांकडे परत

आशामनीषातृष्णा बांधिती दावणीं । सोडवी चक्रपाणीं संतसंगें

ashamanishatrushna bandhiti davanin | sodavi chakrapanin santasangen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आशामनीषातृष्णा बांधिती दावणीं । सोडवी चक्रपाणीं संतसंगें ॥१॥ कामक्रोधालोभ याचा पसर । पाडिती विसर तुझा देवा ॥२॥ मोह ममता भ्रांति ढकलिती कूपीं । दावीं पैं सोपी वाट आम्हां ॥३॥ जनार्दनाचा एका विनवी सर्वांतें । भजा एकचित्तें विठोबासे ॥४॥