भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवडी करितां हरिकीर्तन । हृदयीं प्रगटे जनार्दन

avadi karitan harikirtan | hrudayin pragate janardan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आवडी करितां हरिकीर्तन । हृदयीं प्रगटे जनार्दन ॥१॥ थोर कीर्तनाचें सुख । स्वयें तिष्ठेक आपण देख ॥२॥ घात आलिया निवारी । चक्र गदा घेउनी करीं ॥३॥ कीर्तनीं होऊनी सादर । एका जनार्दनीं तत्पर ॥४॥