भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

आरोहण ज्याचें नंदीवरी । वामांकी शोभे गिरिजां नारी ॥१॥ त्रिशुळ डमरु शंख कपाल । मस्तकी गंगा चंद्रभाळ ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आर्ते आरती दत्त वोवाळूं जातां । आरतीचें हरण दत्तें केलें तत्त्वतां ॥१॥ आरती खुंटली आतां वोवाळूं कैसें । तरी निजभजनें निरंजन होतसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आला रे आला आला काळ निकटी । राम नाम कोटी केव्हां जपसी ॥१॥ बाळ तरुण वृद्ध दशा ती पावली । काळाची पडली छाया अंगीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आलासी पाहुणा नरदेहीं जाणा । चुकवी बंधनापासूनियां ॥१॥ वाउगाची सोस न करी सायास । रामनामें सौरसा जप करी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आलासी पाहुणा नरदेहीं जाणा । चुकवी बंधनापासूनियां ॥१॥ वाउगाची सोस न करीं सायासा । रामनाम सौरसा जप करीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आलिया द्विजासी द्यावें अन्नदान । नसतां अभ्युत्थान द्यावें त्यासी ॥१॥ तेणें जोडे यज्ञ सर्व धर्म जाण । विन्मुख गेलिया पतन घडतसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आली आषाढी जाये पंढरीसी । चित्त पायापाशी विठोबाच्या ॥१॥ वैष्णव गर्जती नामामृत सार । फुटतसे पाझर कामक्रोधा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आली कृपा तिची दिधलासे वर । राहें निरंतर मृत्युलोकीं ॥१॥ पुढे हरिदिनीं जे कोणी करिती । द्वादशीसी घेती निद्रा कांही ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आले आले हरीचे दास । मुखीं रामनाम घोष । तोडोनियां भवपाश । जीवन्मुक्त ते ॥१॥ वैराग्याचें कवच अंगीं । नाचताती प्रेमरंगीं । ज्ञान शस्त्र तें निसंगीं । छेदिती संग ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आलों ऐकोनी खंडोबाची थोरी । वाघा होऊनि मज मागा म्हणती वारी ॥१॥ ठकलों ठकलों वाउगा सीण । वारी मागतां पोट न भरे जाण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आल्या पांच गौळणी पांच रंगाचे शृंगार करुनी ॥धृं॥ पहिली गौळण रंग सफेत । जशी चंद्राची ज्योत । गगनी चांदणी लखलखीत ।

रचनाकार: संत एकनाथ

आल्हाददायकश्रीमुख चांगलें । पाहतां मोहिले भक्त सर्व ॥१॥ गाई गोपाळ विधिल्या गोपिका । श्रीमुख सुंदर देखा सजिरें तें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आल्हादयुक्त गोपिका आली आपुलें सदनीं । नंदासहित मोक्षदानी प्रवेशलें भुवनीं ॥१॥ म्हणे यशोदा बा कृष्णा न करी तूं खोडी । बोलती गोपिका वाईट त्या जगझोडी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आळस करसी नाम घेतां । जासी यमाचिया पंथा । कोण ती सर्वथा । सोडवील तुजलागीं ॥१॥ बंधु बहिणी न ये कामा । काय सांगावें तुज अधमा । गुंतलासी स्त्रीभोग कामा । तेव्हां दूर पळती ते ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ