भजनी मालिका
← भजनांकडे परत

आलिंगोनी देवभक्त । सरते एकरुपी होत

alingoni devabhakta | sarate ekarupi hot

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आलिंगोनी देवभक्त । सरते एकरुपी होत ॥१॥ तें हें पहा पंढरपूर । देव भक्त तीर्थ माहेर ॥२॥ आलियासी दान । नामामृताचि पान ॥३॥ जैसा ज्याचा हेत । पुरवित रुक्मिणीकांत ॥४॥ एका जनार्दनीं शरण । दाखवा पंढरी पावन ॥५॥