भजनी मालिका
← भजनांकडे परत

आली कृपा तिची दिधलासे वर । राहें निरंतर मृत्युलोकीं

ali krupa tichi didhalase var | rahen nirantar mrutyulokin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आली कृपा तिची दिधलासे वर । राहें निरंतर मृत्युलोकीं ॥१॥ पुढे हरिदिनीं जे कोणी करिती । द्वादशीसी घेती निद्रा कांही ॥२॥ त्याचें पुण्य फ़ळ तुजलागीं प्राप्त । हो कां जरी आप्त मज प्रिये ॥३॥ तया पुण्यें तुझा होईल उध्दार । देऊनियां वर ठेवियेली ॥४॥ एका जनार्दनीं उक्ती हे भागवतीं । तुम्हां सर्वांप्रती निवेदली ॥५॥