भजनी मालिका
← भजनांकडे परत

आळस करसी नाम घेतां । जासी यमाचिया पंथा । कोण ती सर्वथा । सोडवील तुजलागीं

alas karasi nam ghetan | jasi yamachiya pantha | kon ti sarvatha | sodavil tujalagin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आळस करसी नाम घेतां । जासी यमाचिया पंथा । कोण ती सर्वथा । सोडवील तुजलागीं ॥१॥ बंधु बहिणी न ये कामा । काय सांगावें तुज अधमा । गुंतलासी स्त्रीभोग कामा । तेव्हां दूर पळती ते ॥२॥ कोण्ही न होती कोणाचे । तूं म्हणसी मामे भाचे । एका जनार्दनीं साचे । कोणी नाहीं पामरा ॥३॥