भजनी मालिका
← भजनांकडे परत

आलों ऐकोनी खंडोबाची थोरी । वाघा होऊनि मज मागा म्हणती वारी

alon aikoni khandobachi thori | vagha houni maj maga mhanati vari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आलों ऐकोनी खंडोबाची थोरी । वाघा होऊनि मज मागा म्हणती वारी ॥१॥ ठकलों ठकलों वाउगा सीण । वारी मागतां पोट न भरे जाण ॥२॥ सदा वागवी कोटंबा आणि झेंडा । रांडापोरें त्यजिलीं जालों काळतोंडा ॥३॥ गेले दोनी ठाव आतां कोठें उरला वाव । एका जनार्दनीं भेटवा मज पंढरीरावो ॥४॥