भजनी मालिका
← भजनांकडे परत

इकडे रुक्माईसी सांगे करुणाकर । चला पैं सत्वर पंढरीये

ikade rukmaisi sange karunakar | chala pain satvar pandhariye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
इकडे रुक्माईसी सांगे करुणाकर । चला पैं सत्वर पंढरीये ॥१॥ गरुडासहित वेगें पैं निघाले । पूर्ववत आले पंढरीये ॥२॥ एका जनार्दनीं भक्ताचा कैवारी । ऐसे करुनी हरी उभा विटे ॥३॥