भजनी मालिका
← भजनांकडे परत

आहर्निशी योगी साधिती साधन । तयासी महिमान न कळेची

aharnishi yogi sadhiti sadhan | tayasi mahiman na kalechi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आहर्निशी योगी साधिती साधन । तयासी महिमान न कळेची ॥१॥ तो हा श्रीहरी बाळवेषें गोकुळीं । खेळे वनमाळी गोवाळीयांसीं ॥२॥ एका जनर्दनीं न कळे महिमान । तटस्थ तें ध्यान मुनीजनीं ॥३॥