भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

हरिहरांसी जे करिती भेद । ते मतवादी जाण निषिद्ध ॥१॥ हरिहर एक तेथें नाहीं भेद । कासयासि वाद मूढ जनीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हरीचें चिंतन हरीचें हृदयीं । हरीचें चिंतन हरांचे हृदयीं ॥१॥ ऐशीं परस्परें गोडी देखा । काय वर्णावें तया सुखा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हरीचें पाहतां श्रीमुख । सुखावलें मन नित्य नवा हर्ष ॥१॥ परमाप्रिय वो श्रीहरी । ध्याता ध्यान ध्येय सर्व हरि ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हरीनामामृत तरले अपार । व्यास वाल्मिकादि निर्धार तरलें जाण ॥१॥ सेवेचिनि मिसें अक्रूर तरला । उद्धोध जाहला हृदयामाजीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हरे भवभय व्यथा चिंतनें । दुर पळती नाना विघ्नें । कलीं कल्मष बंधनें । न बांधती चिंतनें ॥१॥ करा करा म्हणोनि लाहो । चिंतनाचा निर्वाहो । काळाचा तो बिहो । दुर पळे चिंतनें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हर्षा नमाये अंबरीं । येऊनियां झडकरी । द्वारा उघडी निर्भरी । आनंदमय ॥१॥ वृद्धा येऊनियां पाहें । उचलोनि लवलाहे । मुख चुंबिलें तें पाहें । कृष्णाचे देखा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हासोनिया राधा बोले यशोदेशी । यह ओ हा चोर बोल विश्वासी ॥१॥ आण वाहतसे लटकीची मामिसे । याचिया वचनीं सर्वास विश्वासे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हित अनाहिताचीं असतीं वचनें । तेथें अनुमोदन देतां भलें ॥१॥ परमार्थाचे वचनीं द्यावें अनुमोदन । तेथें नारायण संतोषत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हिताकरणें तुम्ही सांगतसे गुज । कांहीं तरी लाज धरा आतां ॥१॥ अवचट नरदेह पावलें निधान । कांहीं सोडवण करीं बापा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हीन जे पामर नावडे वाचे नाम । सदा कामीं काम प्रपंचाचें ॥१॥ भोगिती यातना न सुटे कल्पकोडी । चौर्‍यांयशीची बेडी दृढ पायीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हृदयस्थ अत्माराम नैणती । मूर्ख ते फिरती तीर्थाटणी ॥१॥ काय त्या भ्रंती पुडलीसे जीवा । देवाधिदेवा विसरती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ