भजनी मालिका
← भजनांकडे परत

हीन जे पामर नावडे वाचे नाम । सदा कामीं काम प्रपंचाचें

hin je pamar navade vache nam | sada kamin kam prapanchachen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हीन जे पामर नावडे वाचे नाम । सदा कामीं काम प्रपंचाचें ॥१॥ भोगिती यातना न सुटे कल्पकोडी । चौर्‍यांयशीची बेडी दृढ पायीं ॥२॥ जैसें कर्म केलें तैसेक फळ आलें । कुंथतां वाहिले भार माथां ॥३॥ एका जनार्दनीं संशय न धरावा । आला तो भोगावा विषमकाळ ॥४॥