भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिहरांसी जे करिती भेद । ते मतवादी जाण निषिद्ध

hariharansi je kariti bhed | te matavadi jan nishiddha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हरिहरांसी जे करिती भेद । ते मतवादी जाण निषिद्ध ॥१॥ हरिहर एक तेथें नाहीं भेद । कासयासि वाद मूढ जनीं ॥२॥ गोडीसी साखर साखरेस गोडी । निवाडितां अर्ध दुजी नोहे ॥३॥ एका जनार्दनीं हरिहर म्हणतां । मोक्ष सायुज्यता पायं पडे ॥४॥