भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरीनामामृत तरले अपार । व्यास वाल्मिकादि निर्धार तरलें जाण

harinamamrut tarale apar | vyas valmikadi nirdhar taralen jan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हरीनामामृत तरले अपार । व्यास वाल्मिकादि निर्धार तरलें जाण ॥१॥ सेवेचिनि मिसें अक्रूर तरला । उद्धोध जाहला हृदयामाजीं ॥२॥ सख्यत्वयोगें अर्जुन तरला । प्रत्यक्ष भेटला कृष्णराव ॥३॥ दास्यत्व निकटीं हनुमंता भेटी । हृदय संपुटीं राम वसे ॥४॥ नामधारकपणें प्रल्हादु तरला । प्रत्यक्ष देखिला नरहरी ॥५॥ उपमन्यु बाळक दुधाचिया छंदें । तयासी गोविंदे कृपा केली ॥६॥ ऐसें अपरंपार तरलें नामस्मरणी । एका जनार्दनीं नाम जपे ॥७॥