भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

सोनियांचा देव सोनियाचें देऊळ । सोनियांचा भक्त पूजी सोनियाच्या कमलें ॥१॥ नामची पैं रूप तें अभिन्न । जगीं जनार्दन तोचि पाहे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सोपा मंत्र द्वदश अक्षरीं । वाचे जपे तुं निर्धारीं । अंतकाळीं हरी । न विंसबे तुजसी ॥१॥ धन्य धन्य मंत्रराज । तेणें साधिलें बहुकाज । आम्हं सांपडले निज । वैकुंठभुवनाचें निर्धारें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सोपा मंत्र वाचे हरीहरी म्हणा । तुटेल बंधना यमाचिया ॥१॥ न करी आळस हाचि उपदेश । येणें सावकाश तरती जगीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सोपा वृक्ष फळासी आला । विठ्ठलनामें विस्तारला ॥१॥ वेदां न कळे मूळ शेंडा । शास्त्रें भांडतां पैं तोंडा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सोपानदेव नाम पावन परम । आणिक उत्तम जप नाहीं ॥१॥ माझ्या मना तूं करी कां रे लाहो । सोपानदेव ध्यावो ह्रदयामाजीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सोमवार व्रत एकादशीं करी । त्याचें चरण शिरीं वंदीन मी ॥१॥ शिव विष्णु दोन्हीं एकचि प्रतिमा । ऐसा जया प्रेमा वंदिन त्यासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सोलींव ब्रह्माज्ञान सांगत जे गोष्टी । तें उघड नाचे दृष्टी संतासंगें ॥१॥ गळां तुळशीहार मुद्रांचें श्रृंगार । नामाचा गजर टाळ घोळ ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सोळा सहस्त्र गोपी भोगुनी बह्माचारी । ऐशी अगाध कीर्ति तुमची श्रीहरी ॥१॥ दीन आम्ही रंक वंदितों चरणा । सांभाळीं दीनांलागीं मानसमोहना ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सोहं नव्हे नाद । कर्णद्वयाचा भेद । लक्ष भूमध्य । नव्हें सोहं ॥१॥ चवदा चक्रें बावन्न मात्रा । अकार उकार मकारा । यासी जाणें अर्धमात्रा । तेंचि सोहं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सोहं नव्हें प्रपंच ज्ञान । अंतःकरण चतुष्टय योजन । इंद्रियांचे वर्तन । नव्हे सोहं ॥१॥ सोहं नव्हें विषयपंचक । सोहं नव्हे त्रैशोधक । सोहमाचा विवेक । विरळाचि जाणे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सोहमाची साक्षा मंत्र तोचि दीक्षा । तयाची परीक्षा सांगा मज ॥१॥ सोहमाचें ज्ञान निवडोनियां खूण । अनुभव मज जाण करावा जी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

स्तंभ फ़ोडीत कटकट । दाढा व्यंकट विकट । उध्दट वीर विकट । नरकेसरी ॥१॥ जिव्हा लळलळित लटलट । धुरधुरीत कंठ । श्वासें नासापुट उतट । पिंगट जटाजूट दाट ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

स्थापक व्यापक सर्वदेशीं भरला । पाहतां तो भला पंढरीये ॥१॥ असोनियां नसे नसोनियां असे । योगिया हृदयीं वसे दृष्टीं न पडे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

स्थूल देहाचा विचार । हातां आलिया साचार । तेथें देहें अहंकार । विरोनि जाये ॥१॥ स्थूल ब्रह्माज्ञान नेत्रीं । स्थूलभोग जागृति वैखरी । हें नव्हे मी ऐसा अंतरी । बोध झाला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

स्थूळ ना सुक्ष्म कारण ना महाकारण । यापरता वेगळाचि जाण आहे गे जाय ॥१॥ पुंडलिकाचें प्रेमें मौनस्थ उभा । कोणा न बोले उगला उभा ठेला गे माय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ