भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्थूळ ना सुक्ष्म कारण ना महाकारण । यापरता वेगळाचि जाण आहे गे जाय

sthul na sukshma karan na mahakaran | yaparata vegalachi jan ahe ge jay

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
स्थूळ ना सुक्ष्म कारण ना महाकारण । यापरता वेगळाचि जाण आहे गे जाय ॥१॥ पुंडलिकाचें प्रेमें मौनस्थ उभा । कोणा न बोले उगला उभा ठेला गे माय ॥२॥ निंद्य वंद्य जगीं यावेंभेटीलागीं । दरुशनें उद्धार वेगीं तया गे माय ॥३॥ ऐसा लाघवी खेळ खेळोनी निराळा । एका जनार्दनीं डोळा देखिला गे माय ॥४॥