भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोहमाची साक्षा मंत्र तोचि दीक्षा । तयाची परीक्षा सांगा मज

sohamachi saksha mantra tochi diksha | tayachi pariksha sanga maj

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सोहमाची साक्षा मंत्र तोचि दीक्षा । तयाची परीक्षा सांगा मज ॥१॥ सोहमाचें ज्ञान निवडोनियां खूण । अनुभव मज जाण करावा जी ॥२॥ ऐसें श्रोते जन विनंति करुन । एका जनार्दन नमस्कारिला ॥३॥