भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोमवार व्रत एकादशीं करी । त्याचें चरण शिरीं वंदीन मी

somavar vrat ekadashin kari | tyachen charan shirin vandin mi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सोमवार व्रत एकादशीं करी । त्याचें चरण शिरीं वंदीन मी ॥१॥ शिव विष्णु दोन्हीं एकचि प्रतिमा । ऐसा जया प्रेमा वंदिन त्यासी ॥२॥ सदा सर्वकाळ शिवाचें कीर्तन । आनंदें नर्तन भेदरहित ॥३॥ ऐसा जया भाव सदोदित मनीं । तयाचें चरणीं मिठी घाली ॥४॥ एका जनार्दनीं व्रताचा महिमा । नकळेंचि ब्रह्मा उपरमला ॥५॥