भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोलींव ब्रह्माज्ञान सांगत जे गोष्टी । तें उघड नाचे दृष्टी संतासंगें

solinv brahmadnyan sangat je goshti | ten ughad nache drushti santasangen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सोलींव ब्रह्माज्ञान सांगत जे गोष्टी । तें उघड नाचे दृष्टी संतासंगें ॥१॥ गळां तुळशीहार मुद्रांचें श्रृंगार । नामाचा गजर टाळ घोळ ॥२॥ दिंडी गरुड टक्के मकरंद वैभव । हारुषें नाचे देव तया सुखी ॥३॥ एका जनार्दनीं सुखाची मादुस । जनार्दनें समरस केलें मज ॥४॥