भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरी म्हणोनी टाकी पाय । तया लाभा उणें काय

hari mhanoni taki pay | taya labha unen kay

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हरी म्हणोनी टाकी पाय । तया लाभा उणें काय ॥१॥ नेमें जाती पंढरीसी । आषाढी कार्तिकी वारीसी ॥२॥ घनदाट पिकली पेठ । आलें चोखट ग्राहीक ॥३॥ वस्तु अमोल विटेवरी । एका जनार्दनी अंगिकरी ॥४॥