भजनी मालिका
← भजनांकडे परत

हींच दोनी पैंक साधनें । साधकें निरंतर साधणें

hinch doni paink sadhanen | sadhaken nirantar sadhanen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हींच दोनी पैंक साधनें । साधकें निरंतर साधणें ॥१॥ परद्रव्य परनारी । यांचा विटाळ मनें धरी ॥२॥ नको आणिक उपाय । सेवी सद्गुरूचे पाय ॥३॥ म्हणे एका जनार्दन । न लगे आन तें साधन ॥४॥