भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

येऊनियां कांता सांगे गोरियासी । सहकुटुंबेंसी विठा नाहीं ॥१॥ मृत्तिका आणावयाची नाहीं जाहली वेळ । गेलासे समूळ न पडे दृष्टीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येऊनियां घरा नामदेव पाहे । आजी दिसताहे विपरीत ॥१॥ राजाई तो पुढें येऊनियां बोले । देवें नवल केलें आपुले घरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येऊनियां घरा बोले राजाईस । या परिसें सुवर्णासी करीं आतां ॥१॥ आजाचिये दिन ठेवीं आपुले घरीं । आपदा ती हरी प्रपंचाची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येऊनियां परिसा बोले राजाईसी । आमुचा परीस मजसी देईं बाई ॥१॥ राजाई तंव म्हणे घेऊनि नामदेवें । गेले ते स्वभावें राउळासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येऊनियां मातेपाशीं सांगे वृत्तांत । नामयाची होत आपदा घरीं ॥१॥ आपुला परीस देऊं क्षणभरी । आपदातें दुरी करुं त्याची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येऊनी नामदेव बोले धोंडोबासी ऐवज आमुचा आम्हांसी द्यावा आतां ॥१॥ तुमचा तो करार जाहलासे संपूर्ण । ऐवज आमुचा जाण आम्हां द्यावा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येऊनी राउळा सांगे विठोबासी । वडील आम्हांसी गांजिताती ॥१॥ उदईक कापड घेऊनि बाजारासी जातों । परतोनि येतो सवेंचि घरा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येकीपुढें येक सरसावोनि गोपिका । सांगतो गाह्माणीं तुज नाहीं ठाऊका ॥१॥ रात्री मंचकावारी पहुडतां साजणी । अवचित येऊनी बांधी दाढी आणि वेणी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येणें आमुचे पोरा लावियेला चाळा । आपण निराळा वेगळाची ॥१॥ याचें तो बिढार राउळींच असे । आम्हांसी कोपट नसे बैसावया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येणें आमुच्या पोरा लाविलासे चाळा । तो हा वेगळा उपाधीसी ॥१॥ प्रपंचाचा धाक नाहीं याचे मागें । फ़िरतसे अंगे घरोघरीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येणें कृष्णें आमुचें खादलं दुध दहीं । फोडोनि टाइलें भाजनें पाहीं ॥१॥ आवरी आवरी बाई आपुला कान्हा । न कळे याची कारणी ब्रह्मादिकां नये ध्याना ॥२।।

रचनाकार: संत एकनाथ

येणें छंदे छंद लागली नव्हाळी । हा कान्हो वनमाळी वेध याचा ॥१॥ सरितां सरेना बैसला हृदयीं । तो आतां ठाईचें ठायीं जडलासे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येणें जानें खुंटलें क्रियाकर्म ठेलें । मज माझें भेटलें आत्मरुप ॥१॥ त्यागुं तें काय भोगुं तें काय । सर्व ब्रह्मारुप पाहे कोंदाटलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येणें पंथें बहुत तरले निश्चितीं । आवडी जे गाती विठोबासी ॥१॥ तारक हा मंत्र सोपा पैं सर्वासी । उच्चारितां अहर्निशीं सर्वसिद्ध ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येणें पांडुरंग लावियेला चाळा । बैसलासे डोळां निवडेना ॥१॥ मनाचियें मनें घातिलेंसे ठाण । नोहे उत्थानपन कोणीकडे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येणें पुरतें सर्व काज । विश्वास हा जाहला मज । सांपडलें तें निज । बहुकाळांचे ठेवणे ॥१॥ केला पुंडलिकें उपकार । दाविला सोपामार्ग निर्धार जडजीवां उद्धार । नाममत्रें एकाची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येणेंचि आश्रमें साधती साधनें । तुटती बंधनें यमपाश ॥१॥ काया क्लेश न करणें व्रत तप दान । न लगे हवन तीर्थाटन ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येणेंचि नामें तारिलें बहुतां । दोषी तो पुरता अजामेळ ॥१॥ गणिका आणि वाला अजामेळ भिल्लणी । गोपाळ गौळणी तारियेल्या ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येती कीर्तना आल्हादें । गाती नाचती परमानंदे । सुखाची तीं दोंदें । आनंदें तयासी ॥१॥ धन्य धन्य कीर्तन । धन्य धन्य संतजन । जाले कीर्तनीं पावन । परमानंदगजरीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ