भजनी मालिका
← भजनांकडे परत

येऊनियां परिसा बोले राजाईसी । आमुचा परीस मजसी देईं बाई

yeuniyan parisa bole rajaisi | amucha paris majasi dein bai

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
येऊनियां परिसा बोले राजाईसी । आमुचा परीस मजसी देईं बाई ॥१॥ राजाई तंव म्हणे घेऊनि नामदेवें । गेले ते स्वभावें राउळासी ॥२॥ तुम्ही बसा घरीं मी जातें राउळीं । म्हणोनियां वेगीं आली राउळासी ॥३॥ घालूनियां नामा दंडवत देवा । सांगितला भाव सर्व मनींचा ॥४॥ एका जनार्दनीं नामदेव बोले । परिसा टाकियेलें चंद्रभागें ॥५॥