भजनी मालिका
← भजनांकडे परत

येणें पंथें बहुत तरले निश्चितीं । आवडी जे गाती विठोबासी

yenen panthen bahut tarale nishchitin | avadi je gati vithobasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
येणें पंथें बहुत तरले निश्चितीं । आवडी जे गाती विठोबासी ॥१॥ तारक हा मंत्र सोपा पैं सर्वासी । उच्चारितां अहर्निशीं सर्वसिद्ध ॥२॥ पापा प्रायश्चित कलियुगीं नाम । आणिक सोपें वर्म संतसेवा ॥३॥ न लगे दंडन मुंडन ते आटी । नाम घेतां होटीं सर्व जोडें ॥४॥ एका जनार्दनीं संतांसी शरण । चुके जन्ममरण नाना पीडा ॥५॥