भजनी मालिका
← भजनांकडे परत

येकीपुढें येक सरसावोनि गोपिका । सांगतो गाह्माणीं तुज नाहीं ठाऊका

yekipudhen yek sarasavoni gopika | sangato gahmanin tuj nahin thauka

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
येकीपुढें येक सरसावोनि गोपिका । सांगतो गाह्माणीं तुज नाहीं ठाऊका ॥१॥ रात्री मंचकावारी पहुडतां साजणी । अवचित येऊनी बांधी दाढी आणि वेणी ॥२॥ नाहतां आपुलेअ अंतसदनीं । येऊनियां पुढें बैसें शारंगपाणी ॥३॥ ऐसा कटाळा आणियला येणें । एका जनार्दनीं तुझें आवडतें तान्हें ॥४॥