भजनी मालिका
← भजनांकडे परत

येणें पांडुरंग लावियेला चाळा । बैसलासे डोळां निवडेना

yenen pandurang laviyela chala | baisalase dolan nivadena

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
येणें पांडुरंग लावियेला चाळा । बैसलासे डोळां निवडेना ॥१॥ मनाचियें मनें घातिलेंसे ठाण । नोहे उत्थानपन कोणीकडे ॥२॥ वेधकु वेधकु पंढरीचा राणा । एका जनार्दना शरण होय ॥३॥