भजनी मालिका
← भजनांकडे परत

येणें जानें खुंटलें क्रियाकर्म ठेलें । मज माझें भेटलें आत्मरुप

yenen janen khuntalen kriyakarma thelen | maj majhen bhetalen atmarup

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
येणें जानें खुंटलें क्रियाकर्म ठेलें । मज माझें भेटलें आत्मरुप ॥१॥ त्यागुं तें काय भोगुं तें काय । सर्व ब्रह्मारुप पाहे कोंदाटलें ॥२॥ क्रियाकर्मधर्म निखिळ परब्रह्मा । त्यागुं भोगुं तेथें केवळ भ्रम ॥३॥ एका जनार्दनीम सहजीं सहज एक । एकीएक पहातां कैंचे अनेक ॥४॥