भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

मूर्ति अनुपम्य विटेवरी साजिरी । पाउलें गोजिरें कोविळीं तीं ॥१॥ तेथें माझें मन वेडावलें भारी । परत माघारी परतेना ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मूळची एक सांगतों खूण । एक आधीं मग दोन । तयापासाव चार तीन । व्यापिलें पांचें परिपूर्णं ॥१॥ तें भरुनी असें उरलें । सर्वां ठायीं व्यापियलें । जळीं स्थळीं सर्व भरलें । शेंखीं पाहतां नाहीं उरलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मृगजळाचें दोहीं निःशेष जळ नाहीं । यापरी माया समूळ मिथ्या पाहीं ॥१॥ माया नाहीं माया नाहीं । जगचि ब्रह्मारुप पाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मृगजळाचेनि काय तृषा हरे । अर्कफळें निर्धारें नोहे तृप्ति ॥१॥ पाहतां गोजिरें दिसे वृदांवन । कैं गोडपर न ये त्यासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मृगजळाच्या पुरीं गुंतशीं पामरा । कोण तुज निर्धारा सोडविल ॥१॥ पडशी पतनी चौर्‍यायंशीं आवर्ती । तेव्हा तुझी गती कैशी होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मृगजळीं पहातां दिसतसे जळ । परी तें कोरडेंचि केवळ ॥१॥ तेवीं दिसे जगदाभास । अवघा मिथ्या साभिलाष ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मृतिका आणि अग्नी । देहासी दहन । वस्तुतें व्यापुन । घेतलीं दोनीं ॥१॥ अग्नीमाजीं अग्निरुप । मृत्तिकामाजीं मृत्तिकारुप । जैसें आपीं आप । मिळोनि गेलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मेघदर्शनें मयूर नाचतीं । चंद्रदरुशनें चकोर सुखावती ॥१॥ धेनुदर्शन वत्सें सुखावती । साधुदर्शनें जीवा आनंदवृत्ती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मेळवीं संवगडे खेळतसे बिन्दी । शोभतसे मांदी गोपाळांची ॥१॥ सांवळां सुंदर वैजयंती हार । चिन्मय परिकर पीतांबर ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मेळवोनि मेळा गोपाळांचा हरी । निघे करावया चोरी गोरसाची ॥१॥ धाकुल सवंगडी घेऊनि आपण । चालती रामकृष्ण चोरावया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मेळेवानि मुलें करावी हे चोरी । पूर्ण अवतारी रामकृष्न ॥१॥ पाळती पाहती एका जाणविती । सर्वे जाऊनी खाती दहींदूधा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मैं ज्यावगी छोरकर तोरे गांवाछे । तूं खोरी मतकर मोरे लालछे ॥१॥ मोरे घर तूं आकर लालछे । माखन चुरावत आपणे हातछे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ