भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

मायबाप माझा सोयरा जिवलग । तूंचि पांडूरंग मजलागी ॥१॥ माझियाकारणें पुरविलें धन । केलें माझें संरक्षण मायबाप ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

माया जिवलगा जातां बैसली कृष्ण म्हणे गे आई ।दळण दळिण शिणलिसी हात लावुं गे आई । समान तळी तळींवरी ठेवी पावो ठायीं ॥ क्षणामाजी मी वो दळीन तु कोतुक पाहीं ॥ धृ ॥

रचनाकार: संत एकनाथ

माये आधीं लेक जन्मली । दोघींच्या लग्नाची आयती केली ॥१॥ कोण नोवारा कोण नोवरी । अर्थ पाहतां न कळे निर्धारीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मारग ते बहु बहुत प्रकार । प्रणव विचार जयापरी ॥१॥ आदि अंतु नाहीं मार्गाची ग्वाही । साधनें लवलाहीं वायां पंथें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मारी गावढी चुकलीसे भाई । देखन देखन त्रिभुवनसे आई । उन शोधन लागछे भाई । अब कैसी गत करुछे आई ॥१॥ मथुरा लमानीना मारो नामछे । गावढी देखत आई गांवछे । दृष्टी देखन नहीं मानछे । कैसें भुलाय कन्हयानछे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मार्गी जातां विस्मय करी । कैसें विंदान केले नवल परी । आम्हीं अबला घालितो अचोरी । श्रीहरी परापश्यंती वेगळा ॥१॥ नवल जाहलें काय सांगू माये । चोरी करितां धरिला पाहे । घरां घेऊनि जातां उभा आहे । न कळे विंदान सये काय सांगू ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मालधनी घेउनी आलों असें घरा । तुम्ही कां दातार शिव्या देतां ॥१॥ द्रव्याचा मालक आणूनियां घरीं । ठेविला निर्धारीं काय भय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

माळियांचे वंशी सांवता जन्मला । पावन तो केला वंश त्याचा ॥१॥ त्यासवें हरी खुरुपूं लागे अंगें । धांउनी त्याच्या मागें काम करी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

माहेरींची वास पाहीन मी डोळां संतांचा पैं मेळा येतां देखें ॥१॥ घालुनी दंडवत लागेन मी पायीं । जीव हा उतराई करुनी सांडीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मिथ्या भूतकाया मिथ्या भूतमाया । मिथ्या भूतछाया जेवीं वसे ॥१॥ मिथ्याभूत नाशिवंत जाण । मिथ्याभूत भान सर्व दिसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मिळती गौळणी दारवटीं बैसती । धरुं आतां निश्चिती घरामध्यें ॥१॥ येतो जातो हें न कळे त्यांची माव । वाउगीच हांव धरिताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मिळती सकळां गौळणी ते बाळा । लक्ष लाविती डोळां कृष्णमुखा ॥१॥ धन्य प्रेम तयांचे काय वानुं वाचें । न कळे पुण्य त्यांचे आगमानिगमां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ